ग्रामीण प्रतिनिधीअजय कुंढारे/हसनापूर
अंबड (जालना ) :- येथे सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यदायी तंबाखूमुक्त कार्यशाळा जैन इंग्लिश स्कूल येथे (दि.१९) रोजी संपन्न झाली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सलाम मुंबई फाउंडेशन जिल्हा समन्वयक सारिका कदम,गट समन्वयक अशोक ढेरे, राठोड सर, पवार सर,जैन इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक नंदकिशोर भारद्वाज सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये जिल्हा समन्वयक सारीका कदम यांनी सलाम मुंबई फाऊंडेशनचे कार्य,तंबाखू मुक्तशाळा अभियानाची गरज स्पष्ट केली. गटशिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण यांनी तालुक्यातील शाळा लवकरच तंबाखूमुक्त होतील अशी आशा याप्रसंगी व्यक्त केली. तालुक्यातील तंबाखूमुक्त शाळांचा आढावा घेत मार्गदर्शन केले. यानंतर कार्यशाळेमध्ये तज्ञ मार्गदर्शक श्रीधर कुलकर्णी यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियानातंर्गत नऊ निकष कशाप्रकारे पूर्ण करावेत,राष्ट्रीय बालपरीषद याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच नितीन रोहकले यांनी टोबॅको फ्री ॲपवर फोटो कसे अपलोड करावे याविषयी मार्गदर्शन केले.रामकृष्ण पुरी,आप्पासाहेब उगले यांनी तंबाखूमुक्त अभियानाची गरज व शिक्षकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना तंबाखू मुक्त आरोग्यदायी जीवनाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन रोहकले तर आभार प्रदर्शन श्रीधर कुलकर्णी यांनी केले. यावेळी अंबड तालुक्यातील शिक्षकांची उपस्थिती होती.





Social Plugin