प्रतिनिधी संजय भरदुक मंपीर
मंगरूळपिर__-उद्या दिनांक ३ जुलै रोजी बुधवार ला सकाळी ११ वाजता वाशिम येथे भव्य प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विराट महामोर्चा काढण्यात येत आहे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते थेट जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय वाशिम बळीराजा प्रकल्पग्रसत कॄती संघर्ष समिती वाशिम जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष श्री माणिकराव गंगावणे सर यांच्या नेतृत्वाखाली धडकणार आहे.
यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रमुख दोन मागण्या १)सन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सन २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळणे बाबत. तर दुसरी मागणी २) ५% हून आरक्षण १५% करण्यात यावे.तसेच महाराष्ट्र पुनर्वसन कायद्याप्रमाणे विस्थापित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेणे किंवा शासकीय नौकरी शक्य न झाल्यास एक रक्कमी २० लक्ष रूपये देण्यात यावे. या सह आदी मागण्या करण्यात येणार आहे. या विराट मोर्चात हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी बंधू, भगिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बळीराजा प्रकल्पग्रस्त कॄती संघर्ष समिती वाशिम जिल्हाअध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष श्री माणिकराव गंगावणे सर व सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.





Social Plugin