Ticker

6/recent/ticker-posts

एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत गो.सी. गावंडे महाविद्यालयात वृक्षारोपण



बाळासाहेब पवार प्रतिनिधी

आजच्या युगात वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेता, संतुलन राखणे आपली जबाबदारी आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून, तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारने एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना गो.सी गावंडे महाविद्यालय, उमरखेड यांच्या माध्यमातून महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात प्रत्येक नागरिकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने लावावे व त्याचे संगोपन करावे ही भावना आहे. म्हणूनच, आपण सर्वांनी झाडांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्यांनी केले, आपण अधिकाधिक झाडे लावावीत आणि जंगलतोड थांबवावी. आपण आपल्या दैनंदिन जीवनात झाडांचा योग्य वापर करवा आपण आपल्या भावी पिढीसाठी एक हिरवागार आणि स्वच्छ पर्यावरण राखण्यासाठी प्रयत्न करूया असे राष्ट्रीय सेवा योजना मार्फत सांगण्यात आले.

 वृक्षारोपणासाठी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, वनस्पतीशास्त्र विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचा सहभाग होता. कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून राबविण्यात आला होता व त्यानिमित्त विविध प्रकारच्या विविध प्रजातीच्या वृक्षांची जसे बकुळ, वड, पिंपळ, आवळा, कडुलिंब इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेतील बरेच विद्यार्थी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सहभागाने वृक्ष लागवड करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम व उपप्राचार्य वरिष्ठ विभाग प्रा. डॉ. व्ही. पी. कदम व प्रा. डॉ.डी. व्ही. तायडे, प्रा. डॉ. के. डी. बोंम्पिलवार व सर्व प्रशासकीय कर्मचारी व प्राध्यापक कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाची आखणी व रूपरेषा कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना प्रो. डॉ. प्रशांत अनासने व कनिष्ठ महाविद्यालयाचे रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. इंगळे यांच्यामार्फत करण्यात आले व सोबतच महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग होता. 

वृक्षारोपण कार्यक्रमात प्रा. डॉ. के. एस. सोनटक्के, प्रा. डॉ. एस. एम.चेडे, प्रा. डॉ. एस. व्ही. सुर्वे, श्री. रामेश्वर बावसकर, श्री. दीपकभाऊ पातुरकर, श्री. लक्ष्मण, श्री.दोडके यांचे विशेष सहकार्य लाभले.