हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमली जायगाव नगरी
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
सातारा जिल्हा गुरव समाज संघटना व खटाव तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने श्रावणी व जानवी सोहळ्याचे आयोजन जायगाव औंध येथे करण्यात आले होते .यानिमित्ताने श्रावणी पौर्णिमेस श्री भगवान शंकराचे पारंपारिक गुरव पुजारी एकत्रित येत असतात .पवित्र अशा श्रावण महिन्यात श्रावणी पोर्णिमा श्रवण नक्षत्र जानवी बदलण्याचा पवित्र दिवस मानला जातो . सुरवातीस सर्व गुरव समाज बांधवांनी महादेवाची व गुरव समाजातील थोर संत श्री काशीबा गुरव महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . होमहवन मंत्र पठन झाल्यानंतर समाज बांधवांनी जानवी बदलली . मंतर सामुदायिक मुंजीचे लावण्यात आल्या . यावेळी 27 बटूंच्या मुंजी लावण्यात आल्या या बटूंना प्राध्यापक राजेंद्र गुरव औंध यांनी व उपाध्यक्ष श्री राजेंद्र गुरव गोपूजकर यांनी शिवदीक्षा दिली गुरव समाजातील थोर संत परमपूज्य श्री काशीबा महाराज यांच्या आध्यात्मिक कार्याची ओळख सचिव श्री विजयराव गुरव सर यांनी करून दिली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या यश प्राप्त केलेल्या गुरव समाज बांधवांचा गुरव समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्वर्गीय मधुकरराव गुरव पुसेसावळी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार शितल महेश गुरव यांच्या वतीने दिला जातो.
पुढील वर्षी जानवी व श्रावणी व्रतबंध सोहळ्याचे आयोजन तीर्थक्षेत्र गुरसाळे, तालुका खटाव या ठिकाणी होणार असल्याचे श्री प्रशांत बळीराम वाघ (साहेब ) यांनी जाहीर केले .ह्यावर्षी गुरव समाज भूषण पुरस्कार प्राप्त मानकरी पुढील प्रमाणे वेताळभक्त परमपूज्य श्री दादा महाराज गुरव ,श्री प्रशांत बळीराम वाघ साहेब ,श्री देविदास गुरव सर ,श्री रवींद्रजी गुरव साहेब, श्री विकास गुरव ,श्री अनिल उपाध्ये महाराज, श्री सुभाष गुरव सर ,श्री हरिदास गुरव ,प्राध्यापिका संगीता गुरव, कुमारी मेघल गुरव ,श्री तात्यासो गुरव ,श्री दत्तात्रय गुरव कार्यक्रमास डॉ . श्री महेशराव गुरव ,सुरक्षा साखरे ,प्राचार्य श्री सहदेव गुरव ,श्री आत्माराम गुरव सर ,श्री अशोक शिर्के, श्री विनोद शिर्के ,श्री मोहन गुरव कुमटे ,श्री प्रकाश गुरव ,रोहन गुरव, श्री दत्तात्रय गुरव,श्री वसंत उपाध्ये, श्री शशीकांत शिर्के,श्री मधुकर गुरव, श्री वसंत गाडे, श्री भगवान गुरव, धनंजय गुरव, पांडुरंग गुरव, मनिषा गुरव, राजेंद्र क्षिरसागर, राहूल गुरव सर, भरत गुरव, शिवाजी गुरव,श्री नारायण गुरव, सुनिल गुरव,श्री उदय गुरव सर ,श्री मंगेश गुरव, प्रवीण गुरव, सौ सीमा धुमाळ गुरव ,श्री अवधूत पछाडे, संदीप गुरव, अमोल गुरव, शोभा गुरव तसेच समस्त जायगाव ग्रामस्थ व व जिल्ह्यातील गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर शिवप्रसादाचे वाटप समाजाच्या वतीने करण्यात आले . श्री मोहनराव गुरव सर यांनी सूत्रसंचालन केले .श्री माधव ननावरे सर यांनी आभार मानले





Social Plugin