Ticker

6/recent/ticker-posts

राजाभाऊ जाधव यांचे निधन



पाटण /प्रतिनिधी  

आटोली गावचे सुपुत्र व राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले राजाराम रखमाजी जाधव यांचे आज  सोमवारी दुपारी 4 वाजता एरम हॉस्पिटल कराड येथे उपचार सुरु असताना निधन झाले, गेल्या काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते, 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी, दोन भाऊ, सुना जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे, राजाराम उर्फ राजाभाऊ जाधव हे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे मोरणा विभागातील खंदे समर्थक होते, त्यांनी मोरणा गुरेघर धरणग्रस्त शेतकरी संघटना, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पाटण तालुका  अध्यक्ष,  मानाई व वाघजाई देवी इंडॉसमेंट ट्रस्ट आटोली अध्यक्ष ,सरपंच आटोली आदी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे, 

कर्तुत्ववान, हरहुन्नरी,  समाजासाठी झटणार  तळागाळातील शोषित, पिडीतांसाठी मदतीला धावून जाणारा डोगर भागातील कार्यकर्ता अशी त्यांची तालुक्यात ओळख होती, त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पुनर्वसन आटोली (शिंदेवाडी) ता पाटण येथे उद्या मंगळवारी सकाळी  - 9. 00 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.