बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ माध्य व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागात देश सेवा करणाऱ्या सैनिकांसाठी राख्या स्वतः तयार करून पाठवल्या . हा उपक्रम विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला . यावेळी विद्यालयातील सहशिक्षिका सविता भांगरे , पल्लवी कुंभार ,अंजली कचरे , प्राजक्ता इंगळे या शिक्षिकेनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊ स्वतःही राख्या बनवल्या .या उपक्रमात काही विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूचा वापर करून सुंदर अशा राख्या तयार केल्या .व यासाठी विद्यालयातील सहशिक्षक भगवान सरवदे यांनीही मार्गदर्शन केले .विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आनंददायी शिक्षण या उपक्रमांतर्गत मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला व राख्या तयार करून देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना आपल्या कुटुंबाची व बहिणीची उणीव भासू नये व त्यांनीही त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करावा हा उद्देश ठेवून बंधू भावाचे नाते जपण्यासाठी व राष्ट्रभक्ती प्रेम निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविला गेला .
या उपक्रमात 400 राख्या तयार करण्यात आल्या .जम्मू, कर्नाटक व राजस्थान या देशाच्या सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांना राख्या पाठवल्या .विद्यालयातील सहशिक्षक दडस नाना यांनी प्रोत्साहन म्हणून बक्षीसही दिले . शिक्षक तानाजी पाटील ,संजय माने , नितीन नारागुडे प्रा .दत्तात्रय काळुखे , प्रा विशाल नाळे संताजी देसाई, दिगांबर काळे, . मोनाली खोत , संध्या बोराटे , नवनाथ दळवी , नामदेव धनवडे या सर्व शिक्षकांनी विद्यार्थी याना सहकार्य केले . तसेच महादेव खोमणे, विकास कांबळे, गोविंद बोराटे या शिक्षकेत्तर कर्मचारी यानी राख्या बनवण्यासाठी आवश्यक साहित्य उपल्बध करून दिले . या उपक्रमामुळे विद्यार्थी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .यामुळे विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता भावना दृढ होण्यास मदत होईल .





Social Plugin