शेख बाबा लोणार तालुका प्रतिनिधी
अंजनी खुर्द आणि परिसरात गत काही दिवसापासून सतत रिमझिम पाऊस सुरु आहे. यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे आणि त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, आणि साथीचे रोग पसरत आहे. सध्या सुरु असलेल्या रिमझिम पाऊस आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे मछरांच्या उत्पत्तीत वाढ होऊन ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे ज्यात मोठ्या प्रमाणात डास, मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच कारणाने खाजगी दवाखाने साधारणतः हाऊसफुल होतांना दिसत आहेत यात लहान मुलांचा जास्त समावेश आहे.तरी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन गावात धूर फवारणी करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
.jpeg)




Social Plugin