Ticker

6/recent/ticker-posts

घुंगर्डे हादगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या



बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव 

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील शेतकरी नामदेव आंनसीराम हंकारे वय वर्षे ४२ या शेतकऱ्यांनी दि. २८ रोजी आपल्या शेत वस्ती वर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. नामदेव हंकारे यांना एक मुलगा, व एक मुलगी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ असा परिवार आहे त्यांना जालना येथील दवाखान्यात ऍडमिट केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घुंगर्डे हादगाव येथील स्मशान भूमी मध्ये त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले मृत्यूचे कारण अद्याप कळले नाही. नामदेव हंकारे यांच्या जाण्याने घुंगर्डे हातगाव येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.