हनुमान विद्यालय निढळ येथे विशेष व्याख्यान
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
बचत करणे ही काळाची गरज आहे .आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर प्रत्येकानेच बचत करण्या शिवाय पर्याय नाही.मुलांनी बचतीची सवय ही पिगी बँक पासून सुरु करावी .आपल्याला खाऊचे मिळालेले पैसे पिगी बँक मध्ये टाकून बचतिची सवय लावावी .लहानपना पासून बचतीची सवय लागली तर मोठेपणी बचत आपोआप होईल .तुम्ही किती पैसे कमवता हे महत्त्वाचे नाही .तुमचे किती पैसे शिल्लक राहतात हे महत्त्वाचे आहे .असे मार्गदर्शन निढळ येथील प्रसिद्ध आर्थिक व विमा सल्लागार विलास कुलकर्णी यांनी हनुमान विद्यालय येथे विशेष व्याख्यान मध्ये केले.
विध्यालय मध्ये अनिवासी गुरुकुल प्रकल्प अंतर्गत बाह्य मार्गदर्शन म्हणून प्रसिद्ध आर्थिक विमा सल्ला गार यांनी मुलांना बचत व गुंतवणूक विषयी माहिती सांगितली . पुढे ते म्हणाले विमा हा आपल्या आयुष्या साठी महत्वाचा आहे.प्रत्येकाने विमा काढावा.बचतीची विविध पर्याय उपलब्ध आहेत .फ्लॅट ,सोने ,शेअर्स मार्केट, विमा व इतर अनेक साधने आहेत .प्रत्येकाचे फायदे तोटे वेगळे आहेत .त्यामुळे आपल्या गुंतवणूक थाळी मध्ये सर्व प्रकारचे बचत असावी.प्रास्ताविक गुरुकुल विभागाचे सहाय्यक विभागप्रमुख व्ही जी कांबळे , आभार काटकर सर यांनी केले . या वेळी शाळेचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ, कांबळे एस एन ,देशमुख मॅडम ,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin