Ticker

6/recent/ticker-posts

डीजी कॉलेजमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी भरती परीक्षा मार्गदर्शन वर्ग



 बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयात सन 2013 पासून बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यरत असून या केंद्रातील 400 हून अधिक विद्यार्थी देशातील विविध राष्ट्रीयकृत बँका व वित्तीय संस्थांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, असिस्टंट मॅनेजर, स्पेशालिस्ट ऑफिसर, असिस्टंट, क्लर्क या पदावर कार्यरत आहेत. या केंद्राद्वारे विविध प्रकारच्या बँकिंग स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग चालवले जात आहेत.

      सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेने 263 बँक क्लर्क व 60 शिपाई या पदासाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून दिनांक 21 ऑगस्ट 2024 अखेर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ही सर्व पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती केली जाणार असून जे उमेदवार या बँकेतील पदासाठी इच्छुक आहेत, अशा उमेदवारांची गणितीय अभियोग्यता, बुद्धिमापन चाचणी, बँकिंग, सहकार, अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावर आधारित ऑनलाइन परीक्षा होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. जे उमेदवार गुणानुक्रमे अव्वल मार्क प्राप्त करतील अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे व त्यामधून अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  संपूर्ण भरती प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा व मुलाखत हे दोन महत्त्वाचे टप्पे असून या भरती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी युवक युवतींना अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता असून हे मार्गदर्शन करण्यासाठी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे भरती परीक्षेबाबत 45 दिवस कालावधीचा मार्गदर्शन वर्ग सुरू केला असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, परिसरातील युवक युवतींना सध्याच्या या भरती परीक्षेबाबत उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक व अनुभवी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या केंद्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुसज्य ग्रंथालय, वातानुकूलित अभ्यासिका, डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून दिली जाणार असून ऑनलाइन मॉक टेस्ट करिता संगणक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखत प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. इच्छुक युवक युवतींनी या विशेष बॅच साठी लवकरात लवकर आपले प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन केंद्राचे संचालक डॉ. विजय कुंभार व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विठ्ठल सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयाच्या

https://enrollonline.co.in/Registration/Apply/DGCCS वेबसाईटवर लॉगिन करावे अथवा 88887 80554 या नंबर वर संपर्क साधावा