Ticker

6/recent/ticker-posts

28 सप्टेंबरला माहिती अधिकार दिन साजरा करावा



प्रतिनिधी -किसन भुतांबरे-ओतूर.

माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात माहिती अधिकार या विषयी  जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून शासनाने जिल्हाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो .हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 28 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी  कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा हा शासन निर्णय क्रमांक निर्णय 2008 /पत्र क्रमांक. 378/ 6 सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई  32 दिनांक 20 सप्टेंबर 2008 रोजी घेतला आहे.      सदर शासन निर्णयाद्वारे माहिती अधिकार दिवस जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात आयोजित करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असल्याचे नमूद केलेले आहे .

यावर्षी 28 सप्टेंबर 2024 या दिवशी चौथा शनिवारची सुट्टी व 29 सप्टेंबरला रविवार असल्यामुळे शासकीय निर्णया प्रमाणे सदर माहिती अधिकार दिन हा 27 सप्टेंबर 2024 किंवा 30 सप्टेंबर 2024 या दिवशी साजरा करावा .तसेच  सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय  कार्यालयाला तातडीने कराव्यात अशा सूचना जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या आहेत .आरटीआय कार्यकर्त्यांची जबाबदारी म्हणून  गुरुवार दिनांक 19-09-2024रोजीमाहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्यचे जुन्नर तालुक्यातील  यशवंत शिवराम खरात -संघटक  हरेश पांडुरंग फुलसुंदर - संपर्कप्रमुख .   किसन धोंडीभाऊ भुतांबरे- सचिव धनंजय फुलसुंदर -कार्यकर्ते .राजेंद्र मुळे -कार्यकर्ता . यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय जुन्नर.

. उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय जुन्नर .   उपवन संरक्षक घोड प्रकल्प वन विभाग कार्यालय जुन्नर. उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग कार्यालय जुन्नर. महसूल नायब तहसीलदार कार्यालय जुन्नर.सहाय्यक गटविकास अधिकारी तथा तक्रार निवारण अधिकारी पंचायत समिती कार्यालय जुन्नर. ह्या सर्व कार्यालय प्रमुखांशी चर्चा करून  माहिती अधिकार दिन साजरा करण्याविषयी माहिती देऊन पत्रक सादर केले