Ticker

6/recent/ticker-posts

प्रकल्पग्रस्तांची सहविचार सभा संपन्न


     २९ सप्टेंबर रोजी श्री. शिवाजी विद्यालय व क. महाविद्यालय वाशीम येथे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती ची सभा श्री. बाबुसिंगजी पवार काका यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक समिती अध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर यांच्या उपस्थितीत पार पडली. 

               प्रथम हुसेनभाई मंत्री, शाखा अध्यक्ष कुपटा ता. मानोरा व रमेशराव पुंड रिसोड यांनी समिती पदाधिकारी यांचा सत्कार केला. यावेळी,महादेवराव निंबोकार, गजानन पत्रकार, मधुकरराव पवार अमरावती, संजय पाटील इंगोले, मा. प्राचार्य अरुणराव सरनाईक, शंकरराव शिंदे सर, शिवदास पाटील ताठे, बाबुसिंगजी पवार काका यांनी सभेस संबोधीत केले. शेवटी प्रमुख मार्गदर्शक माणिकराव गंगावणे सर यांनी प्रथम वाशीम जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्त बंधू,भगिनी यांनी प्रत्येक आंदोलनात समिती च्या आदेशाचे पालन करुन आझाद मैदान मुंबई पर्यंत सहभागी झाले त्यामुळेच आपण यशापर्यंत पोचलो.त्यामुळे समिती च्या वतीने सर्वांचे आभार मानले.उपस्थित प्रकल्पग्रस्तांना सविस्तर माहिती दिली व वाशीम जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्त बंधू यांनी कोणत्याही चुकीच्या भूलथापांना बळी न पडता समिती जो आदेश देईल त्याचे पालन करावे असे सांगितले. 

                या सभेमध्ये सर्वांनी पोहरागड चे धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज यांचे व शासनाचे आभार मानले. आपल्या मागण्या सानुग्रह निधी संदर्भात नियामक मंडळाचे मुंबई येथील बैठक मध्ये फक्त मंजूरात मिळाली काम होणे बाकी आहे. जि. आर. निघणे बाकी आहे,समिती त्याचा पाठपुरावा करीत आहे. आज जिल्ह्यात सोयाबीन सोंगणे जोरात सुरू असुन सुद्धा सभेस मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त बंधू, भगिनी उपस्थित होते. यावेळी संतोषराव भिसडे, राधेश्याम शिरसाठ, अलीचंद जिजोरे सर, अशोकराव मगर, देविदास गंगावणे, जयाजी भेंडेकर, शिवाजी घुगे, गणेशराव रहाटे, संजय भरदूक,शंकरराव शिंदे सर, बाळुराव मुसळे,यासह मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. सुत्रसंचालन नंदकिशोर कांबळे सर तर आभार मुखतार खान पटेल यांनी मानले.