Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावमध्ये व्यापारी पेठेतील वाढत्या चोरीच्या घटनांवर उच्चस्तरीय बैठक संपन्न.



पोलीस प्रशासनाची कठोर भूमिकेसह सुरक्षेच्या उपायांची घोषणा

बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

मौजे पुसेगाव येथील व्यापारी पेठेत वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटना, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आणि यावर तातडीने उपाययोजना व दक्षता घेणेबाबत पुसेगाव पोलीस स्टेशनच्या सलोखा सभागृहात एका महत्त्वपूर्ण संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी कोमल शिंगाडे या प्रमुख उपस्थित होत्या. याशिवाय श्री सेवागिरी व्यापारी संघटना, पुसेगाव शहरचे पदाधिकारी, पुसेगाव ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत पुसेगाव पोलीस स्टेशनची भूमिका मांडताना सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे म्हणाले की, सर्व चोरी व दरोड्याचे गुन्हे पोलीस प्रशासनाने अत्यंत गंभीरतेने घेतले असून गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे. या सर्व घटनांची माहिती वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी वेगवेगळ्या टीम नेमण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सातारा देखील या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असून लगतची पोलीस स्टेशन आणि शेजारील जिल्ह्यातील पोलिसांनाही माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुसेगाव पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र मोठे असून अपुया मनुष्यबळामुळे कामाचा ताण भरपूर आहे. तरीही अनेक लहान-मोठ्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरू आहे. व्यापाऱ्यांच्या भावनांची आम्हाला पूर्ण जाणीव असून, जिवाचे रान करून आणि आकाशपाताळ एक करून गुन्हेगार शोधून काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवर कारवाई: चोरीचे सोने-चांदी किंवा इतर माल खरेदी करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिकसीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच संपूर्ण व्यापारी पेठेत पुसेगाव पोलीस स्टेशन, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, दानशूर व्यापारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे आधुनिकीकरण केले जाईल.

रात्रगस्त वाढणारः पुसेगाव पेठेतील मुख्य चारही रस्त्यांवर रात्रीची गस्त वाढवली जाणार असून, त्यासाठी ज्यादा होमगार्डची नियुक्ती करून त्यांना काठी व शिट्टी इत्यादी सुरक्षा साहित्य दिले जाईल. एटीएम सुरक्षाः पुसेगावमधील सर्व बँकांच्या एटीएम सुरक्षेसाठी संबंधित बँकांची लवकरच संयुक्त बैठक बोलावून सुरक्षेच्या योग्य उपाययोजना केल्या जातील.

श्री सेवागिरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राम जाधव यांनी बैठकीत तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की, व्यापारी १८ ते १९ तास स्वतः आपल्या व्यवसायाचे रक्षण करतात, परंतु रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत दुकानांच्या मालमत्तेच्या रक्षणाची जी अपेक्षा स्थानिक पोलीस प्रशासनाकडून असते, तेवढे संरक्षण मिळत नसल्यानेच अशा घटना घडत आहेत.

त्यांनी भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी खालील मागण्या व सूचना केल्या गावात दक्ष नागरिकांचा समावेश करून 'ग्रामसुरक्षा दल' स्थापन करावे आणि त्यांच्या नियमित बैठका घेऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. आजपर्यंत झालेल्या सर्व चोरीच्या घटनांचा तपास बरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा खाजगी व सरकारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी रात्री ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत (किंवा रात्रीच्या वेळेत) पुसेगाव पोलीस स्टेशनच्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांमार्फत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे व्यापारी पेठेत गस्त घालावी.

व्यापारी पेठेत रात्री-अपरात्री प्रवेश करणाऱ्या सर्व लहान-मोठ्या बाहनांची कसून तपासणी करून त्याची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनने ठेवावी. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी कोमल शिंगाडे यांनी आश्वासित केले की, सर्व चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यांचा तपास तांत्रिक बाजूने वेगाने सुरू आहे. लवकरच या सर्व गुन्ह्यांचा छडा लावला जाईल आणि नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेला पोलीस प्रशासन नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देईल. बैठकीच्या शेवटी पुसेगाव विटाचे अंमलदार हेड कॉन्स्टेबल बर्गे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व सलोहिसारखे ही महत्त्वाची संयुक्त बैठक संपन्न झाली.