Ticker

6/recent/ticker-posts

नवेगाव बु. येथे मोठ्या थाटात तान्हा पोळा सण साजरा


 आ. राजूभाऊ कारेमोरे यांच्याकडून टिफिन बॉक्सचे वितरण

               मोहाडी तालुक्यातील मौजा नवेगाव बु. येथे तान्हा पोळ्याचा सण मोठ्या थाटात व उत्साहात सर्व बाळ गोपाळ व समस्थ ग्रामवाशी व महिला मंडळी यांच्या सहभागाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजुभाऊ  कारेमोरे यांच्याकडून  सर्व  मुलांना टिफीन बॉक्स वितरण करण्यात आले, पोळा समितीकडून बास्केट बॉक्स चे वितरण करण्यात आले.व नंदी आणि नंदी सजावट , वेशभूषा यांना प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थी आणि पाचवे बक्षीस ट्रॉफी व धनराशी, शाल  श्रीफळ च्या माध्यमातून श्री राजू चकोले,वामनराव चकोले ,विजय बांते, चिंतामण तिबुडे, अमित तिबुडे ,अंकुश चकोले, नरेंद्र मोहतूरे, श्रीराम शेंडे,गौरी माटे यांच्याकडून देण्यात आले.

यावेळी गावातील सरपंच तृप्ती अमित तिबुडे, उपसरपंच अंकुश चकोले, ग्रामपंचायत सदस्य जयकिसन शेंडे ,मंगेश पुराम, पूजा चकोले ,प्रतिभा बांते, सुषमा मेश्राम, काजल वाघाडे, तंटामुक्ती अध्यक्ष चिंतामण तिबुडे,श्रीराम शेंडे, वामन चकोले, विजय बांते, जसवंत तिबुडे, सूर्यप्रसाद तिबुडे,मोहन कोडवते, शालीकराम कोळवते जागेश्वर तीबुडे , गौरीशंकर चकोले,योगेश्वर शेंडे, अण्णा  तिबुडे,मारुती चकोले, चुनीलाल बावनकर, रामेश्वर  तिबुडे, बापू बांते, ताराचंद शेंडे,अक्षय पुडके, संदीप चकोले, विक्रांत मोहतूरे, कल्याण मित्र बांते,विष्णुदास तिबुडे, महादेव मोहतूरे, मिताराम तिबुडे, भोजराज मोहतुरे,कार्तिक चकोले , भिवा चकोले, परमेश्वर तिबुडे, संदीप भेलावे, दिवान टेकाम, गजानन तिबुडे, शंकर चकोले, योगेश्वर पटले, नरेंद्र मोहतुरे, दिनेश चकोले,श्रीकृष्ण शेंडे, भाऊदास चमलाटे व मोठ्या संख्येने गावकरी यांनी सहभाग घेतला. या संपूर्ण कार्यक्रम शांततेने पार पाडल्याबद्दल संपूर्ण ग्रामवासी यांचे सरपंच तृप्ती तिबुडे यांनी आभार मानले व समाजात किंवा गावात झालेल्या सणामुळे बळीराजांचे आपल्या बैलजोडी विषयीचे प्रेम व समाजात शांतता आणि सुव्यवस्था व एकता टिकविण्याचे कार्य  पोळा सण साजरा करण्याच्या माध्यमातून आपल्या समाजात होते असे मत व्यक्त केले.