Ticker

6/recent/ticker-posts

पतीची गळफास घेऊन आत्महत्या; कौटुंबिक कलहातून घटना.


नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख,

गळफास घेतलेल्या अवस्थेतील पतीच्या लटकत्या मृतदेहासमोर मांडलेल्या पूजासाहित्याजवळ त्याची पत्नी पूजाविधी करण्यासाठी बसली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार अघोरी आणि जादूटोण्याचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला शिवाय तो व्हिडिओ व्हायरल झाल्याने जेलरोड भागात जादूटोण्याच्या आणि अंधश्रद्धेच्या प्रकारातून पतीचा बळी दिला गेल्याची चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेचे नाशिकरोड पोलिसांनी खंडन केले असून हा प्रकार अघोरी किंवा जादूटोण्यातून झालेला नसून मानसिक व कौटुंबिक जाचातून घडला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नागरिक मात्र या व्हिडिओच्या आधारे शंका उपस्थित करत आहेत.

जेलरोड भागातील ब्रिजनगरमध्ये ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठपूर्वी नवनाथ भगवंत घायवट (५४) या व्यक्तीने त्याच्या घरी स्वयंपाक घरातील छताला असलेल्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. परंतु या घटनेला आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतर नवनाथ घायवट या व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.