प्रतिनिधी , नाशिक,अमन शेख, 

ईद मिलादुन्नबी च्या पर्वावर मुस्लिम बांधवांवर यंदा मोठा उत्साह दिसला . यावेळी ,सुरू असलेल्या गणपती परवावर ईद मिलादुन्नबी साजरी करत असताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक दिसून आले . तर यावरून समाजाची एक राहून एकत्र राहणे अशी नीतिमत्ता दिसून आली यावेळी नाशिक मध्ये ठीक ठिकाणी जोमाने तयारी दिसून आली, 

ईद मिलादुन्नबी च्या पार्श्वभूमीवर असलेली तयारी बघता काटेकोर बंदोबस्त देखील पोलिसांनी मार्गी लावला. ठीक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणांवर शहरांमध्ये ईद मिलादुन्नबी साजरी करण्यात आली,  तर यावेळी प्रत्येक मौलाना पासून तर लहान मुलांपर्यंत चांगलीच गर्दी दिसून आली नाशिकमध्ये परंपरागत असलेल्या ईद मिलादुन्नबीच्या मिरवणुकीला चांगला प्रतिसाद मिळाला, 

यावेळी लाखोंच्या संख्येत मुस्लिम बांधव उपस्थित होते आणि मिरवणुकीमध्ये उत्साहाने दिसले तर नेहमीप्रमाणे नाशिकमध्ये मिरवणुकीचा मार्ग तोच असल्यामुळे नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास भोगाव लागला नाही .

तर नाशिक शहर वगळता काही ठिकाणी ईद मिलादुन्नबी साजरा करण्यासाठी प्रशासनाने पुढील काही तारखा दिलेल्या आहेत आणि नियोजनानुसार ईद मिलादुन्नबी साजरा होणार असल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये चांगलीच उत्सुकता आहे.