राजेश टोपेच्या गावातील शेतकरी पुत्रासाठी घाटगे साहेब अर्ध्या रात्री तहसील कार्यालयात
बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव
राजेश टोपे यांच्या गावातील शेतकरी कुटुंबातील मुलाचे तीन दिवसापासून वडिलोपार्जित शेत जमिनीसाठी अंबड तहसील कार्यालयात आमरण उपोषण सुरु होते. तिसर्या दिवशी प्रकृती खालावली असताना ना आमदाराने दखल घेतली ना अधिकारी वर्गाने. शेवटी सतीश घाटगे साहेबांनी अर्ध्या रात्री तहसील कार्यालय गाठून उपोषणकर्त्या शेतकरी पुत्राची भेट घेतली.
तहसीलदाराला फोन करून जाब विचारला, लोकशाही पद्धतीने प्रश्न सोडविण्याचा शब्द देऊन घाटगे साहेबांनी शेतकरी पुत्राचे उपोषण सोडवले. त्याला स्व:ताच्या गाडीत दवाखान्यात नेऊन उपचार केले. त्यानंतर घरी सोडले. ही खरी जबाबदार नेत्याची माणुसकी असते. जी आज घाटगे साहेबांनी दाखवून दिली





Social Plugin