नाशिक, प्रतिनिधी, अमन शेख,
यंदाच्या सुरू असलेल्या गणपती पर्वावर ठीक ठिकाणी वेगवेगळी निदर्शने ,चित्र ,बॅनर, देशभक्तीपर साहित्य ,तर काही आवडीचे छंद खूप लोकांकडून जोपासले जातात .
त्यापैकी काही नावलौकिक होतात तर काही मर्यादित राहतात ,यंदाच्या बाप्पांच्या आगमनावर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे किंवा आगळे वेगळे चित्र बघण्यास मिळाले तसेच, नाशिक येथील उपेंद्र नगर भागात राहत असलेले नाशिकचे सुप्रसिद्ध डॉक्टर Dr. मनोज सोनकुसारे यांनी आपले वैद्यकीय सेवा कार्य जपून केलेले सुंदर छायाचित्रीकरण ,आपल्या हाताने रांगोळीत कसे उतरवले हे बघायला मिळाले एक डॉक्टर असताना वेळात वेळ काढून छंद जोपासणे यासाठी मोठे धाडस लागते ,
ते नेहमीच आपल्या कलेतून मुलांना संस्कार देत असतात परंतु यावेळी त्यांनी चक्क आपल्या हाताने 3D रांगोळी काढत नाशिकलाच हैराण केले यावर त्यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले की ,
" माझी वैद्यकीय सेवा हे माझे कर्तव्य आहे ,परंतु माझ्यासारखे छंद जोपासणारे फार कमी आहे तर माझ्या दृष्टिकोनातून सर्वांनी आपली छंद नेहमी जोपासले पाहिजे त्यासाठी वयाची अट नसते ,
अट असते तर ती योग्य छंदाची माझ्यासारख्या सर्वांनी आपल्या छंद आपल्या कामांसोबत जपले पाहिजेत ज्यामुळे मिळणारा आनंद हा जरी क्षणभर असला तरी त्यात तुमचे जीवदान आहे त्याचे कारण म्हणजे , तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असताना तुम्हाला कुठल्याही आजाराची ओढ लागत नाही.





Social Plugin