नाशिक ,प्रतिनिधी,अमन शेख,
महिनाभरापूर्वी नाशिक शहरात खुनाच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शहरात तरुणावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज मंगळवारी (दि.०१) रोजी सकाळी गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकाजवळून आकाश धनवटे नावाचा युवक पंडित कॉलनी परिसराकडे जात होता. त्यावेळी संशयित अथर्व दाते याने त्याच्या इतर चार ते पाच साथीदारांसोबत येऊन आकाश धनवटे याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच हल्ला केल्यानंतर संशयित पसार झाले असून सरकारवाडा पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. तर संशयित आणि आकाश हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.





Social Plugin