प्रतिनिधी- विशाल बिराजदार
विधानसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता लागू झाली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघात ३ लाख, ३० हजार ९३५ मतदार संख्या असून एकूण ३४७ मतदान केंद्र आहेत. मतदारांनी मतदान यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी व तसेच लोकशाहीतील मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या या महाउत्सवात मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहान निवडणूक निर्णय अधिकारी तथा निलंग्याचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार कुलदीप देशमुख उपस्थित होते. निलंगा विधानसभा मतदारसंघात एक लाख ७३ हजार ५१ पुरुष मतदार,
एक लाख ५७ हजार ४७९ स्री मतदार, तर ३९८ सैनिक मतदार आहेत. १८ ते १९ वयोगटातील ७६३७ युवा म तदार, ८५ वर्षावरील ६२२१ मतदार व २८५० दिव्यांग मतदार आहेत. निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी येथे प्रत्येकी एक सखी मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र, असणार आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येक उमेदवारांना ४० लाख रुपये खर्च करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. वाहन व सभेच्या परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा येथे एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघात ४० झोनल अधिकारी व तीन फ्लाईंग स्कॉडची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारसंघातील औराद शहाजानी, टाकळी बोंबळी व शिरुर अनंतपाळ येथे चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने १९५० हा नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक दिला असून सिव्हिझील पच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तक्रारीवर १०० मिनिटांत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शरद झाडके यांनी दिली.





Social Plugin