Ticker

6/recent/ticker-posts

महावीर नगरातील सरस्वती मंदिरात घटस्थापना .



ग्रामीण प्रतिनिधी मारोती गाडगे/कटचिंचोली 

   गेवराई - दि ०३/ गुरुवार राजेंद्र सर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेवराई महावीर नगरातील सरस्वती मंदिरात घटस्थापना . वाल उद्योग समूहाच्या वतीने बागपिंपळगाव कॅम्प  नजिकच्या महावीर नगरात उभारलेल्या सुबक सुसज्ज अशा श्री सरस्वती देवीच्या मंदिरात शारदीय  दुर्गोत्सवानिमित्त ३  ऑक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात आली . नवरात्रीचे पहिल्या दिवशी ऋषभसेठ गंगवाल यांच्या हस्ते  पूजन करून विधिवत  घटस्थापना करण्यात आली . 

गंगवाल परिवाराने दोन एकर क्षेत्रात उभारलेल्या श्री सरस्वती  देवी मंदिरचा परिसर अतिशय मनमोहक आहे . फुलांची झाडे आणि जेष्ठ नागरिकांना विरंगुळा करण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे . धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत गेवराई शहरापासून ४ किमी अंतरावर हे मंदिर असून येथे लहान मुलांसाठी टॉय ट्रेन असून महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवार व रविवारी सायं ४ . ३० ते ५ .३० या  वाजता यावेळेत लहान मुलांसाठी टॉय ट्रेन व सुंदर उद्यान उपलब्ध राहील . नवरात्रात दररोज  सकाळी ७  वाजता आणि रात्री ८ वाजता देवीची  आरती होणार आहे . गेवराई पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन गंगवाल परिवाराने केले आहे .