Ticker

6/recent/ticker-posts

पिंपरी पेंढारला बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार



प्रतिनिधी -किसन भुतांबरे -ओतूर 

जुन्नर तालुक्यात पिंपरी पेंढार गावाजवळील तिरपट शिवारात रवींद्र ढेरे हे आपल्या शेतात राहतात .त्यांनी अनेक पाळीव जनावरे पाळलेली आहेत.श्री रवींद्र डेरे हे वर्षांनुवर्षे तिरपट शिवारात शेती करतात. जोडव्यवसाय व्यवसाय म्हणून पाळीव प्राणी म्हणजे जनावरे पाळलेले आहेत .

दररोजच्या वेळेनुसार पहाटेच्या साडेपाच वाजता श्री रविंद्र ढेरे यांची पत्नी सौ.सुजाता रवींद्र डेरे ह्या जनावरांना चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेली . आडोशाला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सौ.सुजाता रवींद्र ढेरे या महिलेवर हल्ला केला. तिने आरडाओरडा केला परंतु काही कळण्याच्याआत जवळ कोणी नसल्याने थोड्याच वेळात बिबट्याने तीला  ठार केले. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेताच बिबट्याने पळ काढला.

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याचे समजताच जुन्नर तालुक्यातील विघ्नहर साखर कारखान्याची चेअरमन श्री सत्यशील शेरकर आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत घटनास्थळी लवकरच पोहोचले. परिसरातील शेकडो लोक जमा झाले यावेळी वन खात्याचे अधिकारी अमोल सातपुते, प्रदीप चव्हाण व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले 

जुन्नर तालुक्यात बिबट्या प्रवन क्षेत्र असल्याचे शासनाने घोषित केलेले आहे .त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढतच आहे. अशा घटना अनेक घडतात त्यासाठी या घटना घडू नये म्हणून बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी आणि सत्यशील शेतकरी यांनी  वनविभागाच्या अधिकाऱ्यांना  उपाययोजना करण्यासाठी सांगितले . वनाधिकाऱ्यांनी लगेच परिसरात पिंजरे लावले .तसेच गावकऱ्यांचे निवेदन शासनाला पाठविण्याचे आश्वासन दिले.