Ticker

6/recent/ticker-posts

नवचैतन्य समाज विकास तरुण मंडळाच्या वतीने जांब गावाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार



 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" हा भाव मनात ठेवून मी व माझ्या प्रत्येक सहकार्याने जांब सारख्या दुर्गम भागात प्रत्येक विद्यार्थ्याला घडवताना  देवपूजा ज्या तळमळीने, श्रध्देने व निष्ठेने करतात त्याच पदधतीने ज्ञान ज्ञानाचं काम केले व दगडातून सुंदर मूर्ती घडवल्या.आज या मुलांना देण्यात आलेल्या शिदोरीच्या बळावर  वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व  गाजवत आहेत हे पाहून  आम्हांला सार्थ अभिमान वाटतो प्रतिपादन प्राचार्य दत्तात्रय गोफने यांनी केले.

  जांब (त. खटाव) येथे नवचैतन्य समाज विकास तरुण मंडळाच्या वतीने आयोजित विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान सोहळा प्रसंगी ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाला सरपंच अमित मदने, उद्योजक विजयकुमार शेटे, आजी -माजी सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

              श्री. गोफने पुढं म्हणाले,   नवचैतन्य समाज विकास तरुण मंडळाच्या वतीने झालेला सन्मान हे आमच्यासाठी अनपेक्षित गोड भेट असून आम्हीं सर्वजण भारावून गेलो.यावर्षी मंडळाने आदर्शवत व स्तुत्य उपक्रम राबवला. या समितीने गावातील मतभेद ,गटतटाला बगल देत गावचा नावलौकिक वाढवण्यात ज्या लोकांनी योगदान दिले त्यांना सन्मानीत करून  त्यांच्या कार्याचा  यथोचित गौरव केला. मंडळाने या माध्यमांतून दाखवलेल्या औदाऱ्याने व एकीच्या भावनेने आम्हीं सर्वजण भारावून गेलो आहोत. त्याचप्रमाणे मंडळाच्या वतीने विविध प्रकारच्या उत्सव प्रसंगी समजाभिमुख व पर्यावरण पूरक उपक्रम राबवले जातात. सर्व प्रकारची मिरवणुका टाळ-मृदंग, लेझीम, ढोल, ताशा या पारंपरिक वाद्यांच्या तालावर शांततापूर्ण वातावरणात पार पडतात. यातून प्रगलभतेचं दर्शन घडत असल्याचं मत त्यांनी यावळी व्यक्त केले.

            दरम्यान मंडळाच्या वतीने कृषी,शिक्षण, आरोग्य, भारतीय सेनादल, क्रीडा, योगसाधना, स्पर्धापरीक्षा,क्रीडा, पोलिस दल आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, महिला बचत गटांच्या महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, आजी - माजी शिक्षक, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विजय कचरे, बाजीराव वावरे, डॉ.प्रतीक्षा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक शिवलिंग शिखरे यांनी केले तर सूत्रसंचालन  मोहनराव गुरव यांनी केले व आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.