प्रतिनिधी लाखांदूर - शैलेश कावळे
लाखांदूर तालुक्यातील मौजा दोनाड येथे नवचैतन्य शारदा महिला मंडळ यांच्या वतिने नवरात्री च्या शुभ प्रसंगी दिनांक 07/10/2024 रोज सोमवार ला गावातील महिला मंडळानी स्वतः धाडस करून व नाटकातील सर्व पात्र महिलांनी स्वीकारुण दोनाड या गावी तिन अंकी नाटक संगीत सुख आले माझ्या दारी या नाटकाचा प्रयोग सादर केले.
या प्रसंगी नाटकाचे उदघाटक माझी जिल्हा परिषद अध्यक्ष .मा.वसंताजी एचिलवार, सहउदघाटक शिवसेना लाखांदूर तालुका प्रमुख मा.देवचंदभाऊ कावळे, अध्यक्ष पंचायत समिती सदस्य मा.मंगेशजी राऊत, उपाध्यक्ष खैरना येथील सरपंच तुळसीदासजी बुरडे,दोनाड येथील सरपंच मा.शिवदासजी बुरडे,.मा.जितुभाऊ राऊत,टारजनजी बुरडे, प्रभुजी कुभंरे,रवि भाऊ बगमारे, संजयकुमार मैद व प्रतिष्ठित मान्यवर आणि गावकरी उपस्थित होते.
या नाट्य प्रसंगी मा.देवचंभाऊ कावळे यांनी मार्गदर्शन केले कि स्टेजच्या माध्यमातून मान्यवर येतात आणि भाषण देऊन जातात.परंतु भाषण देणारे देतात पण राशन देणे हेही महत्त्वाचे आहे.आणि राशन देणे म्हणजे क्षेत्रातील, परीसरातील विकास करणे. आज या परिसरात महत्वाचे आहे म्हणजे बस सेवा, कारण खैरना,दोनाड,नांदेड मार्गे लाखांदूर ते पवनी बस सुरू होणे गरजेचे आहे नाही तर झालीच पाहिजे कारण या परीसरातील शाळेकरी मुलांना पाच ते सहा किलोमीटर चा प्रवास पाई किंवा सायकलने करावा लागतो तेव्हा कोठे बस मिळतो, आणि हा प्रश्न शाळेतील विद्यार्थ्यांनाच नाही तर या परीसरातील माझ्या आई बहीण किंवा ज्येष्ठांना सुध्दा सहन करावा लागतो.आणि हा प्रश्न जेव्हा या क्षेत्रातील प्रतिनिधी सोडवतिल तेव्हा या नाटकाच्या नावाप्रमाणे या परीसरातील जनतेला थोडा का नाही सुख मिळेल.या विषयावर मा.देवचंदभाऊ कावळे यांनी मार्गदर्शन केले आणि दोनाड येथील गावकर्यांचे आभार मानले.





Social Plugin