Ticker

6/recent/ticker-posts

अनधिकृत रेशन वितरणामुळे महिलेला अपमानित केल्याची गंभीर तक्रार



रायपूर प्रतिनिधी  मोहम्मद रफिक 

बुलढाणा, 10 ऑक्टोबर 2024 – बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर गावात एक महिला अनधिकृत रेशन वितरणाच्या आरोपांमुळे अपमानित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार तबस्सुम परवीन सै. सहेराब यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सविस्तर लेखी तक्रार सादर केली आहे. तबस्सुम यांच्या तक्रारीनुसार, आर.एन. राजपूत यांचे रेशन दुकान अनधिकृतपणे चालवणाऱ्या नंदू बापू देशमुख यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्या तक्रारीत नमूद करतात की, गेल्या काही महिन्यांपासून नंदू देशमुख रेशन वितरणात गैरव्यवहार करीत आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीत रेशन दुकान चालवत आहेत.

तबस्सुम यांनी स्पष्ट केले की, त्यांनी प्रत्येक महिन्यात शिधा मिळविण्यासाठी रेशन दुकानाकडे गेल्यावर, देशमुख यांनी त्यांचा अंगठा घेतला, परंतु त्यांना धान्य दिले नाही. त्यांना वारंवार आश्वासन दिले गेले, परंतु प्रत्यक्षात शिधा मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबात उपासमारीची वेळ आली आहे. "माझ्या पतीने मला सोडले आहे, त्यामुळे मी एकटीच माझ्या मुलांचे पालनपोषण करत आहे. शासनाच्या रेशनवर आमच्या जीवनाचा अवलंब आहे," अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.दिवसांपूर्वी, 9 ऑक्टोबर 2024 रोजी, जब त्यांनी रेशन घेण्यासाठी गेले, तेव्हा नंदू देशमुख यांनी त्यांना धान्य देण्यास स्पष्ट नकार दिला. याबद्दल त्यांनी अपमानास्पद भाषेत बोलून त्यांना धमकावले, ज्यामुळे त्या सर्वांसमक्ष अपमानित झाल्या. "मी तुम्हाला धान्य देणार नाही, तुम्हाला तक्रार करायची असेल तर करा," असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहे.

तबस्सुम यांनी तक्रारीत म्हटले आहे की, शासनाच्या वन नेशन वन राशन कार्ड योजनेंतर्गत त्यांना शिधा मिळवण्याचा हक्क आहे. तरीही, देशमुख यांच्यासारखे अनधिकृत विक्रेते त्यांना या हक्कापासून वंचित ठेवत आहेत. त्यांनी प्रशासनाकडे नम्र विनंती केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करावा.तबस्सुम यांनी पुढील कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. "जर मला न्याय मिळाला नाही, तर मी रेशन दुकानासमोर उपोषण करणार आहे," अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.