Ticker

6/recent/ticker-posts

मी इथला भाई आहे’ म्हणत दाम्पत्याच्या गाडीवर कोयत्याने हल्ला; जीवे मारण्याची धमकी ...


नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख ,

जेलरोड परिसरातील महाजन हॉसिपटलच्या पाठीमागील रस्त्यावर टोळक्याने एकाच्या कारच्या पाठीमागील काचेवर कोयत्याने मारून नुकसान केले. तसेच कारमधील दाम्पत्याला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ते पत्नीसह कारने जात होते. त्यावेळी रस्त्यात संशयित साहिल उनवणे हा हातात कोयता घेऊन “मी या परिसराचा भाई आहे” असे म्हणत परिसरात दहशत माजवित होता. त्यावेळी त्याने गांगुर्डे यांच्या कारच्या मागच्या काचेवर कोयता मारून नुकसान करीत, त्यांच्या समवेतच्या दोघा संशयितांनी कारमधील दाम्पत्याला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे