सचिन पाटील
दि.1 डिसेंबर ते 7 डिसेंबर. पासून आंतरराष्ट्रीय कथा वाचक श्री प्रदीप मिश्रा यांच्या मुखवानीतून महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू समाजाला एकजूट करण्याचे काम श्री प्रदीप मिश्रा शिवमहापुराणकथेच्या माध्यमातून करत आहेत.
शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी शिरपूर नगरीमध्ये लाखोच्यावर भाविकांनी उपस्थिती दिलेली आहे. महाराजांचे स्वागत भव्य दिव्य अशा पद्धतीने करण्यात आलेले आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांना कथा श्रवण करण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळांनी काही ज्यादा बसेसची सुविधा केलेली आहे. कथेची आयोजन ज्या ठिकाणी करण्यात आले आहे त्या ठिकाणी 60 एकर जमिनीची उपलब्धता करून सर्व प्रकारची सोय भाविकांसाठी करण्यात आलेली आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच जे भावीक रात्रीचे वेळी मुक्कामाला थांबतात अशा भाविकांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.
श्री प्रदीप मिश्रा यांच्या मुखवाणीतून शिव महापुराण कथेचे श्रवण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनतेने उत्साह व प्रतिसाद दर्शविलेला आहे.





Social Plugin