Ticker

6/recent/ticker-posts

श्री सेवगिरी यात्रेनिमित्त रंगलेला बेलगाडा शर्यतींचा थरार.



पुसेगाव : विजेत्या गाडीवानांना पारितोषिक वितरणप्रसंगी ना . महेश शिंदे , मठाधिपती सुंदरगिरी  महाराज , ट्रस्टचे चेअरमन ,विश्वस्त व मान्यवर.
पुसेगावातील बैलगाडी शर्यतींना अभूतपूर्व प्रतिसाद; एक हजार  ९९९बैलगाड्यांची नोंद


बुध , दि.  (प्रकाश राजेघाटगे) 

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील लाखो बैलगाडी शर्यत शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री सेवागिरी यात्रोत्सवातील 'श्री सेवागिरी हिंदकेसरी' बैलगाडी शर्यतीला पुसेगावमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यामध्ये श्री खंडेश्वर प्रसन्न ओवी प्रमोद वाघ वाघवाडी ( उदय वाघ ) यांच्या रोमन आणि सर्जा या घरच्या   बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचे दोन लाख ७७  रुपयांचे रोख बक्षीस जिंकून 'श्री सेवागिरी हिंदकेसरी'चा किताब पटकवला.

पुसेगाव येथील दहिवडी रोड, बैल बाजाराजवळील मैदानात सकाळी ७ वाजता मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या उपस्थितीत लाइव्ह ऑन कॅमेरा चिठ्ठी पद्धतीने लॉटस पाडले गेले. सकाळी आठ वाजता मानाचा नारळ फोडून पहिला फेरा सुरू झाला. शर्यतीसाठी एक हजार ९९९ विक्रमी गाड्यांची नोंद होऊन गटाचे १०० फेरे व सेमिफायनलच्या १० फेऱ्या झाल्या . कमिटीच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे एक दिवसात फायनल झाली. अचूक निकाल पाहण्यासाठी ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेरे तैनात करण्यात आले होते. शासनाच्या नियम व अटींच्या अधीन राहून शर्यती झाल्या. दुसऱ्या क्रमांकापासून विजयी गाडी मालकांची नावे पुढीलप्रमाणे : 

२)पिंटूशेठ मोडक रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण-पुणे, ३)जय सेवालाल प्रसन्न ओंकार सुभाष राठोड वखारी जालना, ४) महालक्ष्मी प्रसन्न धारपुडी संगमनेर-शिर्डी एक्सप्रेस सुलतान, ५)(कै.)सुरेखा मच्छिंद्र गुरव खातवळ निंबोडी, ६)आई सावबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे, ७)भैरवनाथ प्रसन्न आयुषदादा हरपळे फुरसुंगी, ८)समीरशेठ भोईर मोठागाव, ९)नाथबाबा प्रसन्न पैलवान समीक्षा अभिजीत पाटील विटा, १०)नाथसाहेब प्रसन्न मोहीलशेठ धुमाळ सुसगाव, ११)श्री सोमेश्वर प्रसन्न आजी-माजी सरपंच करंजेपूल, १२)कु. आयेशा एन. डी. शेठ पाटील बुर्दुल मुंबई. पुसेगावात बैलांना पळण्यासाठी आणि प्रेक्षकांना पाहण्यासाठी नंदनवन असेल असे मैदान तयार केले होते. मैदानात एकापेक्षा एक जातिवंत खिल्लार आणि म्हैसूर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांच्या शर्यतीचा थरार प्रेक्षकांना अनुभवता आला.

प्रत्येक फेरा चुरशीचा होऊन स्पर्धा उत्कंठावर्धक झाली. ही तीन राऊंड बैलगाडा शयंत होती. गटाचे १०० फेरे व सेमीफायनलच्या दहा फेऱ्या झाल्या. मैदानात उत्कृष्ट धावपट्ट्या, बॅरिकेडस्, प्रेक्षक गॅलरी, ड्रोन कॅमेरे, लाइव्ह कॅमेरे, मोठे स्क्रीन, थेट प्रक्षेपण, जनावरांना चारापाणी, सुसज्ज पार्किंग व्यवस्था, पारदर्शक निकाल आणि आरोग्यविषयक सोयिसुविधा केल्याने बैलगाडा मालक आणि शौकिनांनी देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी व ग्रामस्थांचे कौतुक केले.        विजेत्या बैलगाडी मालकांना रोख रक्कम व प्रत्येकी दोन ढाली देऊन सन्मातीत केले गेले . प्रत्येक सेमीफायनलमध्ये दोन नंबर करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाला उत्तेजनार्थ . सन्मानचिन्ह तर गट विजेत्या प्रथम बैलगाडीसाठी सन्मानचिन्ह देण्यात आले .