Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल च्या स्पोटामुळे मुख्याध्यापकाचा मृत्यु



 ग्रामीण प्रतीनिधी- यादवराव बुराडे 

 देसाईगंज (वडसा) तालुक्यांतील जिल्हा गडचिरोली येथील कसारी जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री सुरेश संग्रामे हे दुचाकी चालवित असतांना त्यांच्या वरच्या खिशातील मोबाईल च्या स्फोटमुळे अपघात होवून त्यांचे आकास्मीक निधन झाले. सविस्तर वृत्त असे की, त्यांचे वरच्या सदऱ्याच्या खिशात नेहमी प्रमाणे मोबाईल ठेवलेले होते सदर मोबाईल चे Internet network सुरुच होते. शाळा करून आपल्या गावी जात असतांना त्यांच्या मोबाईल चा स्फोट झाला त्यामंध्ये त्यांना दुखापात होवुन ते जखमी झाले.

 व त्पोलिसांना सुचना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून त्यांना उपचारा करीता ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे नेण्यात आले त्यावेळी डॅाक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. सुरेश संग्रामे हे ५५ वर्षाचे होते व त्यांची मुळ वस्ती गोंदिया जिल्ह्यातील सिरेगांव टोला येथील असुन ते जि.प. प्राथमिक शाळा कसारी तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथील शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. 

त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असुन त्यांच्या अकस्मित निधनामुळे त्यांच्या परिवारात तसेच कसारी व सिरेगांव येथे शोककळा पसरली होती. म्हणुन सर्वाना अशी विनंती आहे की, मोबाईल चा वापर करतांना जरा जपुन करावा पाहीजे तेव्हाच वापर करा व चुकून वरच्या खीशात मोबाईल ठेवु नका. व कोणतेही वाहन चालवीत असतांना व मोबाईल चार्जींग ला लावले असतांना मोबाईल चे नेट बंदच ठेवा. व मोबाईल ला आपला मीत्र पण आहे आणि शत्रु पण आहे ते कस हाताळायचे हे तुमच्याच हातात आहे.