Ticker

6/recent/ticker-posts

श्री दत्त जन्मोत्सव सोहळा चे आयोजन


मितेश जैन - कल्याण प्रतिनिधी

कल्याण - कल्याण पूर्वेतील सामाजिक हितासाठी लढणारे व सामाजिक कार्य करणारे युवकांचे मित्र मंडळ श्री दत्त तरुण मंडळ यांच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन कल्याण पूर्व येथील परशुराम वाडी येथे शनिवार दिनांक 14 डिसेंबर व 15 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून भजन दत्तात्रय ईश्वर पुरुष सुखद अभिषेक श्री दत्त जन्मोत्सव महाआरती श्री दत्त बाग भजन व 15 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून श्री सत्यनारायणाची महापूजा व सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे व कल्याण पूर्वेतील परशुराम वाडी येथे सण १९७४ सालापासून श्री दत्त जन्मोत्सव आम्ही साजरा करत आहोत अशी माहिती श्रीदत्त तरुण मंडळाचे सचिव राकेश कुरकुरे यांनी दिली. जास्तीत जास्त भाविकांनी श्री दत्त यांचे दर्शनाचे घेऊन विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन महाप्रसादेचे लाभ घ्यावे अशी विनंती मंडळाचे अध्यक्ष विलास दळवी व प्रमुख कार्यवाह मारुती खबाळे यांनी केली.