Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन कडून विदयार्थ्यांना मोफत शालेय शैक्षणिक साहित्य वाटप


कृष्णा पवार @ग्रामीण प्रतिनीधी नाशिक अलंगुण

आज दि. २८/१२/२०२४ रोजी आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन नाशिक जिल्हा, " एक हात मदतीचा " मा. रतनजी धूम साहेब यांच्या संकल्पने ने एका वट वृक्षाच्या वृक्षारोपणा नंतरत्याच्या छायेत मदतीच्या ओघाने आज आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन, यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथ. शाळा पायरपाडा (हतगड ) ता. सुरगाणा जि. नाशिक येथे २३ शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य दप्तर, वही, पेन, पेन्सिल, रबर,पट्टी,चॉकलेट, चिवडा बिस्कीट पुडे इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी फाऊंडेशन चे सदस्य, श्री.परशराम पाडवी सर यांनी फाउंडेशन उभारणी करण्या मागची सर्व सविस्तर माहिती सांगितली. तसेच आपले फाउंडेशन हे गरीब व होतकरू विदयार्थ्यांना मदत करीत आहे. तसेच श्री.सोमनाथ पवार सरांनी आपल्या मनोगतात विदयार्थ्यांनी प्रेरणा घेऊन देशाचे सुजाण नागरिक घडतील असे मार्गदर्शन केले. 

यावेळी भागवत चौधरी मा.रा.आदिवासी शिक्षक संघटना अध्यक्ष, हरेराम गायकवाड सर, काशिनाथ गायकवाड साहेब , बापू गारे साहेब , मनोहर गांगुर्डे, पद्माकर गायकवाड सर, गणेश गायकवाड सर, सोमनाथ पवार सर, गोविंद जानुरे सर, मधुकर पालवा सर, हरेराम गायकवाड सर, गणेश गायकवाड सर, दत्तात्रय चव्हाण सर, अशोक बागुल smc अध्यक्ष, तसेच पालक - एकनाथ दळवी, काशीराम बागुल, माधव बागुल, रमेश बागुल, लक्ष्मण बागुल, वसंत बागुल, प्रकाश बागुल ,भगवान बागूल ,ईश्वर बागुल, हौसाबाई बागुल , कविता बागुल इत्यादी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू जोपळे सरांनी केले व आभार शाळेचे मुख्याध्यापक राणा चौधरी सरांनी मानले,यावेळी चुमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहतांना दिसून येत होता.