पत्रकार: अक्षय ढेंगळे
बातमी: बारलिंगा (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील भुपेंद्र डिगांबर पाटील यांनी "डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला", "आत्मा" व महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन "अॅग्रोटेक २०२४" मध्ये पोंगनुरू गाईचे प्रदर्शन केले. ही गाय कमी जागेत, कमी खर्चात आणि कोणत्याही वातावरणात सहज पाळता येते. गाईचा आकार २४-३६ इंच असून वजन १००-१५० किलो आहे. तिचे दूध १-२ लिटरपर्यंत मिळते, ज्यामध्ये ६-८% फॅट्सचे प्रमाण असते. या दुधात पौष्टिक व औषधी गुणधर्म आहेत. पाटील यांनी गाईच्या संगोपनाबाबत सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना गोपालनासाठी प्रेरित केले. लहान मुलांपासून शेतकरी बांधवांची विशेष गर्दी पोंगनुरू गाईला पाहण्यासाठी झाली. त्यांच्या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला





Social Plugin