Ticker

6/recent/ticker-posts

वर्षा वजीरची जालना पोलिसमध्ये निवड



अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ 

सुखापुरी : अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील वर्षा बंडू वजीर हिची जालना पोलिसमध्ये निवड झाली. या यशाबद्दल तिची फुलांचा वर्षाव करत गावातून मिरवणूक काढण्यात आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वर्षाने जिद्द, चिकाटी आणि संघर्ष करत यशाला गवसणी घातली. विशेष म्हणजे रेवलगावमध्ये कसलीही सुविधा नाही. पहिली ते चौथीपर्यंत शाळा. त्यातही दोनच शिक्षक असतात. त्यानंतर पुढील शिक्षणसाठी सात किलोमीटर सुखापुरीला पायी जावे लागते. बसची सुविधा नाही. अशा संघर्षावर मात करत वर्षाने यश मिळवले. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.