ग्रामीण प्रतिनिधी  मारोती गाडगे/कटचिंचोली 

गेवराई (बीड):-  ता,१५/०१२सोमवार  परभणी प्रकरणातील भीम सैनिकाचा सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या तरूणाचा PCR घेताना  जेल मध्ये मृत्यू झाला..परभणी पोलीस प्रशासन वरती 302 चा गुन्हा दाखल करावा.या मागणी साठी गेवराई तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला.परभणी घटनेचा व शहिद सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ आज सोमवार दिनांक‌ १६/१२/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता पोलीस व राज्य शासनाचा निषेध  म्हणून वंचित बहुजन आघाडी व सर्वसंघटनेच्या वतीने गेवराई पोलीस स्टेशन समोर व तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले .

 तरी गेवराई तालुक्यातील  तमाम आंबेडकरी व संविधानवादी जनतेने राज्य सरकारचा व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येन सहभागी होऊन मोठा प्रतिसाद दिला.व गेवराई बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.