बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व असे यश मिळाले. गेल्या 40 वर्षात कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा राजकीय आघाडीला महाराष्ट्रात एवढे मोठे यश मिळाले नव्हते, अशी दैदिप्यमान कामगिरी महायुतीने केली. भाजपाने 132 जागा जिंकून अव्वल कामगिरी केली तर सातारा जिल्ह्याचा विचार करता महायुतीने सर्वच्या सर्व आठही जागा जिंकत न भूतो ना भविष्य अशी कामगिरी केली. कोरेगाव तालुक्याचा विचार करता आमदार श्री महेश शिंदे यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे निष्टांवंत आमदार श्री शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव केला. कोरोना काळातील काळातील केलेली जनतेची सेवा व विकासाभूमिक राजकारण यामुळे आमदार श्री महेश शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला आशा आहे याबाबत काही दिवसातच यासंबंधीची गोड बातमी मिळेल अशी अंतर्गत सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून श्री महेश शिंदे हे तब्बल 45 हजार मतांच्या आघाडीने विजयी झाले. गेल्या पाच वर्षातील त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. गेली वीस वर्षे रखडलेली जिहे कठापुर योजना त्यांच्याच कार्यकाळात कार्यान्वित झाली. मतदार संघातील अनेक अंतर्गत रस्ते, समाज मंदिरे व स्वच्छ पाणीपुरवठा योजना त्यांनी पूर्णत्वास आणल्या आहेत. राजकीय दृष्ट्या सातारा जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी ते नेहमीच जागृत दिसत आहेत. जिल्ह्यातील विकासात्मक योजनेसाठी ते विधानमंडळात नेहमीच दिसतात. त्यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागू शकते असे दिसून येत आहे.
हिंदुत्वाचा आश्वासक चेहरा येत्या काही दिवसात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी इच्छुकांचे रिपोर्ट कार्ड मागवून घेतली आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता यावेळेस जिल्ह्याला कमीत कमी दोन केबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी आशा आहे. निवडून आलेल्या आमदारांपैकी कोरेगावचे विद्यमान आमदार यांचा चेहरा खूपच आश्वासक असा आहे. व्यापक हिंदुत्वाबाबत ते नेहमीच आग्रही असतात. तसेच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गुडबुक मध्ये श्री महेश शिंदे नेहमीच दिसून येतात. अजून एक महत्वाची बाब अशी की श्री महेश शिंदे यांची पाटी कोरी आहे. त्यांच्यावर आज पर्यंत कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले नाहीत. तसेच शिवसेना व भाजप यांच्या कार्यकर्त्यामधील मध्यम दुवा होण्याचे काम ते जिल्ह्यात नेहमीच करतात. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार व विद्यमान खासदार श्री उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. याची दखल पक्षश्रेष्ठी घेतील असा कयास बांधला गेला असता श्री महेश शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशी शक्यता आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसात तरुणांचे आयडाँल व रचनात्मक व शाश्वत विकासाचे राजकारण करणारे श्री महेश शिंदे मंत्रिमंडळात दिसले तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.





Social Plugin