Ticker

6/recent/ticker-posts

वनराई संस्थे अंतर्गत शिवारपाडा, कवडासर आणि देवघर येथील शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी ब्रोकोली पिकाची लागवड



कृष्णा पवार @ग्रामीण प्रतिनीधी नाशिक (अलंगुन) 

दिंडोरी - दिंडोरी तालुक्यात परनाॅड रिकार्ड इंडिया कंपनी यांच्या आर्थिक सहयोगातुन व वनराई संस्था पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम प्रकल्प अंतर्गत मागिल तीन वर्षांपासून आदिवासी शेतकरी यांच्या सोबत काम करत असून वनराई संस्था हि शेतकरयांना सोबतीला घेऊन शेतकरी यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी नविन प्रयोग राबवित असते त्याच अनुषंगाने या वर्षि संस्थेच्या मार्गदर्शनाने ब्रोकली पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट घेण्यात येणार असुन त्यासाठी शेतकरी यांना ब्रोकोली रोप, ड्रिप संच, खते यांचे सहकार्य करुन आज सुरुवात करण्यात आली . प्रात्यक्षिक प्लॉट साठी वनराई संस्थेचे कर्मचारी योगेश खैरनार ,दिलीप दळवी यांचे मार्गदर्शन शेतकरी यांना वेळी वेळी मिळत असते .