बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे]
जाखणगाव (ता. खटाव) येथील डॉ.प्रणिता वैभव जाधव- रणनवरे यांना सेंटर फॉर नॅनो अँड मटेरियल सायन्सेस, जैन युनिव्हर्सिटी, बेंगलोर येथून नुकतीच नानोटेक्नॉलॉजी (नॅनो मेडिसिन्स) या विषयातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांनी "सिंथेसिस अँड कॅरेक्टरिझेशन ऑफ ड्रग-पोलिमर नॅनो कॉन्जुगेट्स फॉर इन्हानसड थेरपेटीक पोटेन्शिअल ऑफ वॉटर इन्सोल्युबल ड्रग्स" या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले आहे. न्यूरोसायन्स, कॅन्सर, सूक्ष्मजीवशास्त्र, आरोग्य, औषध निर्मिती व त्यांचे वितरण या अनुप्रयोगां मध्ये त्यांनी विशेष कौशल्य प्राप्त केले आहे. याशिवाय प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रमुख लेखक म्हणून ७ शोध प्रबंध व ६ सह-लेखक संशोधन लेख असे एकूण १३ संशोधनलेख वितरित केले आहेत. या संशोधनाच्या काळात त्यांना डॉ. रंगप्पा केरी आणि डॉ. वर्षा ब्रह्मखत्री यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
त्याचप्रमाणे वडील सुभाष रणवरे, पती वैभव जाधव,चुलते सोमनाथ रणनवरे, आई वर्षा रणनवरे, वंदना जाधव व भाऊ प्रथमेश रणवरे या सदस्यांचे या कामात विशेष सहकार्य लाभले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गोकुळ प्राथमिक शाळा कृष्णानगर, सातारा येथे , माध्यमिक शिक्षण अण्णासाहेब कल्याणी विद्यालय ,महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा आणि पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झाले.पाडळी व जाखणगाव ग्रामस्थ व स्नेही परीवारातून त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे.
.jpg)




Social Plugin