राजकुमार चिंचोळकर 

बाळापूर 

तालुक्यातील वाडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेला पाणी पुरवठा जवळपास मागील दोन महिन्यांपासून बंद असल्यावरुन ग्रामपंचायत कार्यालयात महिलासह नागरिकांचा दिनांक 24 डिसेंबर रोजी मोर्चा धडकला आहे येथील प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक चार मधील पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाणी समस्या निर्माण झाली आहे प्रभागातील रस्ते व नाली बांधकामामुळे रस्त्याचे ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आल्याने जलवाहिन्या फुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे पाणी पुरवठाच बंद असल्यात जमा आहे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्राम प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली असून या बाबतीत दुर्लक्षित पणा केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच काही भागात पाणी पुरवठा सुरू असला तरी दुषीत पाणी पुरवठा होत असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे प्रभागातील जवळपास पंचवीस टक्के नागरिक दुषीत पाण्यामुळे आजारी पडली असल्याचे समोर करण्यात आले आहे त्याचप्रमाणे प्रभागातील लाईट बऱ्याच दिवसांपासून बंद पडली आहेत माहिती देवून सुध्दा लाईट सुरू करण्यात येत नाहीत त्यामुळे नागरिकांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी ग्रामप्रशासनाची अकार्यक्षम क्षमता असल्याचेही त्यावेळी बोलल्या जात होते. 


                                                      सचिव यांची तात्काळ बदली करा!

येथे कार्यरत असलेले सचिव यांचेकडे इतरही गावाचा प्रभार आहे त्यामुळे सचिव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुरेसा वेळ देवू शकत नाहीत. सचिव यांना गावातील समस्यांची माहिती नसते तर समस्या सोडवतील कधी ? मोठी ग्रामपंचायत असल्याने येथे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नियुक्त का? करण्यात येत नाही असा प्रश्न नागरिकांकडून त्यावेळी उपस्थित करण्यात आला.


फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्तीचे काम सुरू आहे शक्य होईल तितक्या लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत  --रुपाली शहाणे सरपंच 


सरपंच उपसरपंच तसेच सचिव यांना प्रभागातील समस्या निकाली काढण्यासाठी वेळोवेळी सांगितले जात आहे परंतु या बाबतीत दुर्लक्ष केले जात आहे  शेख मोईन शेख ख्वाजा  ग्रामपंचायत सदस्य प्रभाग क्रमांक पाच