बुध दि. ३० (प्रकाश राजेघाटगे) -
पुसेगाव येथील श्रीसेवागिरी महाजांच्या रथोत्सवासाठी विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने यावेळी रथावर ८६लाख ६२ हजार ५०० रुपयांच्या नोटा अर्पण केल्या. यावर्षी १२ लाख ४०ह्जार १९४ रुपयांनी वाढ झाली आहे .
रविवारी सकाळी दहा सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती ना . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते रथ पुजन झाले . यावेळी मठाधिपती प .पू. सुंदरगिरी महाराज , ग्रामविकास मंत्री ना .जयकुमार गोरे , कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना . महेश शिंदे ,खासदार उदयनराजे भोसले ,आमदार शशिकांत शिंदे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ . सुरेश जाधव , विश्वस्त रणधीर जाधव , संतोष जाधव , . संतोष वाघ , सचिन देशमुख , गौरव जाधव ,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी , भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यसिल कदम , डॉ . प्रियाताई शिंदे व ग्रामस्थ उपस्थित हाते . रथपूजन झाल्यानंतर सेवागिरी महाराजांच्या रथाने पुसेगाव प्रदक्षिणेला प्रारंभ केला. श्रीसेवागिरी मंदिरातील समाधीपूजनानंतर झाल्यावर
अकरा वाजता रथ मिरवणूकीसाठी हलविण्यात आला . राज्यातील विविध भाविकांनी रथावर ८६ लाख ६२हजार ५००रुपये अर्पण केले . श्री सेवागिरी महाराजांवरील अपाट श्रध्देमुळे गोरगरीब लोकही ऐपतीप्रमाणे पैसे रथावर अर्पण करुन नतमस्तक होतात .काही कारणास्तव रथोत्सवास येऊ न शकणारे भाविक यात्राकाळात समाधी व रथदर्शनासाठी येऊ रथावर रक्कम अर्पण करतात. त्यामुळे रथावरील रकमेत आणखी वाढ होईलअसे सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी सांगितले. रथावरील जमा झालेली रक्कम ही सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे गोरगरिब व्यकींसाठी तसे समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगी आणली जाते. पोलिस विभागाने सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन केल्यामुळे अनुचित प्रकार घडत नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप पोमण यांनी सांगितले .अकरा वाजता नोटा मोजण्यास सुरुवात झाली. पहाटे चार वाजेपर्यंत नोटा मोजण्याचे काम पूर्ण झाले.यामध्ये पाचशे रुपयांच्या ६९७५, दोनशे रुपयांच्या २९११, शंभर रुपयांच्या २६८३४, पन्नास रुपयांच्या २१४७६, वीस रुपयांच्या २९८३६, दहा रुपयांच्या १८८१० रुपयांच्या नोटा रथावरती जमा झाल्या तर पाचशे रुपयांची २० नाणी, दोनशे रुपयांची २० नाणी, शंभर रुपयांची ५ नाणी, वीस रुपयांची २ नाणी, दोन रुपयांची २ नाणी, एक रुपयांची १९३ नाणी जमा झाली. त्याचबरोबर परदेशी चलन सुद्धा रथावरती जमा झाल्याचे पाहायला मिळाले. मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ . सुरेश जाधव ,विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ , सचिन देशमुख, गौरव जाधव सचिव विशाल माने , व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेचे नेटके नियोजन करण्यात आले होते. पहाटेपर्यंत रथावरील रक्कम मोजण्याचे काम चालू होते, यामध्ये गावातील स्वयंसेवक आणि बँकेतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.





Social Plugin