गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
महिलाआर्थिक विकासमहामंडळ,वाशीम द्वारा स्थापित अल्पसंख्यांक लोक संचालित साधन केंद्र कारंजा कार्यालयात १८ डिसेंबर २०२४ रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त्याने अल्पसंख्यांक विकास विभाग व माविम यांच्या सयुक्त विद्यमाने अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुकाची निवड करण्यात आली असून सन २०११ पासून कारंजा शहरामध्ये अल्पसंख्यांक लोक संचालित साधन केंद्र द्वारे राबविण्यात येत असून याद्वारे अल्पसंख्यांक समुदायातून ४३७ महिला बचत गट स्थापन करण्यात आले आहे . याद्वारे योजने अंतर्गत बचत गत्च्या माध्यामतून महिलांना स्वयंरोजगार,उधोजक प्रशिक्षण,आर्थिक सहाय्य ,विविध शासकीय योजनाचा लाभ ,बचत गटाच्या उत्पादित वस्तूला बाजारपेठ ई च्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यात येत आहे.
१८ डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिन च्या निमित्त्याने अल्पसंख्याक समुदायासाठी असलेल्या विविध योजनाची माहिती देण्यात आली . कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी मा.राजेश नागपुरे,जिल्हा समन्वय अधिकारी माविम वाशीम यासह मा . सीमा सोनोने ,अध्यक्षा अल्प.cmrc कारंजा,मा.प्रांजली वसाके ,कार्यक्रम अधिकारी माविम वाशीम व cmrc कार्यकारिणी यांची उपस्थिती होती. जिल्हा समन्वय अधिकारी श्री.राजेश नागपुरे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले कि,भारत हा विविध जाती धर्म आणि भाषाच संगम असलेला देश आहे. भारतीय साविधना नुसार सर्व नागरिकांना समान अधिकार असून अल्पसंख्यांक समुदायाच्या हक्काचे स्वराक्ष्ण करणे व त्यांना प्रगती साठी प्रोत्साहन देणे हे अत्यंत महत्वाचे आहे यातीलच एक भाग म्हणून अल्पसंख्यांक विभागा महारष्ट्र शासनाने अल्पसंख्यांक महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळाला दिली असून महाराष्ट्र राज्यातील केवळ १० जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे .त्यापैकी वाशीम जिल्हा हा त्यापैकी एक असून अल्पसंख्यांक cmrc कारंजा च्या माध्यमातून आपण यशस्वीपणे राबवीत आहे. व अल्पसंख्यांकाच्या विकासामध्ये एक भूमिका निभवत आहे . आज अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या निमित्त्याने अल्पसंख्यांक समुदायास असलेली साविधानिक अधिकाराची जाणीव करून देण्याचा दिन म्हणून आपण हा दिवस साजरा करीत आहो यानिमित्त आपणास आपले हक्क व अधिकाराची जाणीव होवून आपला उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी शुभेछ्या देण्यात आल्या.
याप्रसंगी कारंजा शहरातील अल्पसंख्यांक समुदायातील बचत गटाच्या महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक विजय वाहने यांनी केले व कार्यक्रमच्या याश्विते करिता cmrc चा सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली .





Social Plugin