Ticker

6/recent/ticker-posts

पै अभिजीत प्रभाकर पवार याची ओपन गटातून निवड



 बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरीसाठी खटाव तालुक्यातील नवलेवाडीचा सुपुत्र ( ललगुण )पै अभिजीत प्रभाकर पवार याची  ओपन गटातून निवड झाली .महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा यांचे वतीने ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी ची निवड चाचणी अडुळ ता .पाटण येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू युवा उद्योजक पै महेश पवार यांनी आयोजित केली होती.याच स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील अनेक कुस्तीगीरांनी सहभाग नोंदवला होता.

          ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धा वर्धा या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचा निवडलेला संघ पुढीलप्रमाणे.

1)55 kg- जयंत नितीन शेडगे - आसू 

2)60 kg- प्रवीण सतीश शिंदे -लोणंद 

3)63 kg - यशराज अशोक जाधव - अंगापूर 

4)67 kg - विकास रामचंद्र पिसाळ- जांभुळणी 

5)72 kg - ओंकार मानसिंग घाडगे- फत्त्यापूर 

6)77 kg- सुशांत साहेबराव पालवे - जांभुळणी 

 पै.आकाश महाजन -शेनोली 

7)82 kg- रोहित चंद्राहार खाडे - मांडवे 

8)87 kg - यज्ञेश किशोर शितोळे- सातारा 

9)97 kg - प्रमोद संताजी जाधव- डिस्कळ 

10)ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी 

87 ते 130kg- अभिजीत प्रभाकर पवार नवलेवाडी (ललगून )

        निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा अध्यक्ष महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे, जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा, सरचिटणीस पै धनंजय पाटील काका अटके कर आणि जिल्हा कुस्तीगीर संघ साताराचे तांत्रिक अधिकारी आणि स्पर्धाप्रमुख NIS कोच प्रा पै अमोल साठे यांनी 

अभिनंदन  करून शुभेच्छा दिल्या.

 स्पर्धा प्रमुख महेश पवार यांनी खेळाडूंना शाल ,श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार केला.

        स्पर्धेसाठी पंच म्हणून, पै रमेश थोरात सर,प्रा सुनील लोखंडे , पै प्रल्हाद जाधव आणि पै उज्वला साळुंखे मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट रित्या कामगिरी पार पाडली.