बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी
पळशी फाटा ते अंबाळी फाटा दरम्यान देशमुख यांच्या शेतालगत वेलफेर इंग्लिश स्कूल दहागाव शाळेच्या स्कूल बस क्रमांक MH 29M 8488 या बसच्या चालकाने आज सकाळी निबाच्या झाडाला जबर धडक दिल्याने कु. महिमा आप्पाराव सरकाटे ह्या १४ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महिमा ही दिवटपिंप्री या गावांमध्ये राहत होती. शाळेकरीता रोज बसने ये-जा करत होती पण आज काळाने तिच्यावर घात घालून एकुलत्या एक मुलीला आई-वडिलांपासून दूर केले आहे.
सदर घटना ही ह्रदय पिळवून टाकणारी आहे. महिमा वर्ग ९ वी मध्ये शिकत होती. या घटनेमुळे उमरखेड तालुका सह पिंपरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.या बस मध्ये कॉन्व्हेंट मधील ३ ते ४ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. बसमधील काही विद्यार्थ्यांना किरकोळ ईजा झाली तर काही विद्यार्थी सुखरूप आहेत अशी माहिती मिळाली आहे.पुढील तपास पोफाळी स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे हे करीत आहेत.





Social Plugin