*महसूल विभागाची धडक कारवाई! लवकरच खाजगी रस्त्यावर बोजा दाखल करणार?*
*सिंदखेडराजा/ज्ञानेश्वर तिकटे*
सिंदखेडराजा:- तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याने सदर अवैध उत्खनन व वाहतूक बंद करण्यासाठी महसूल विभागाने धडक कारवाई व जेथे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होतो तेथे बैठे पथकांची स्थापना करून अवैध रेती उत्खनन व वाहतूक बंद करण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अजित दिवटे यांच्या सुचनेनुसार आज तारीख 24 जानेवारी रोजी देवखेड येथील दोन खाजगी रस्ते,ताडशिवणी येथील दोन खाजगी रस्ते, पिंपळगाव कुडा येथील एक खाजगी रस्ता जेसीबी च्या सहाय्याने तोडण्यात आले आहे याचप्रमाणे तालुक्यातील नदीपात्रात जाणारे सर्व खाजगी रस्ते दोन दिवसात तोडण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार अजित दिवटे यांनी दिली आहे तालुक्यातील खासगी रस्ते तोडण्यासाठी मंडळ अधिकारी गजानन मनसुटे ग्राम महसूल अधिकारी एस आर नागरे, रविंद्र लांडगे, यशवंत घरजाळे,जायभाये, महसूल सेवक आकाश माघाडे, रामेश्वर खरात, राजेंद्र खरात यांनी ही कारवाई केली
*हिवरखेड पूर्णा येथे बैठे पथकांची स्थापना*
सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील रेती तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याने सदर ठिकाणी बैठे पथकांची स्थापना करण्यात आली आहे





Social Plugin