मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले
वाशिम : वाशिम येथून 20 कि.मी,अंतरावर असलेल्या ग्राम कोकलगाव येथे स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एक साप असल्याचे नागरिकांना आढळून आले. यावेळी संबंधित माहितीही सर्पमित्र विष्णू पायघन, प्रदिप पट्टेबहादूर यांना देण्यात आली. त्यानुसार सर्पमित्र घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता. भारतीय नाग जातीचा विषारी साप असल्याचे सर्पमित्रांच्या लक्षात आले. सर्पमित्रांनी त्या सापाला रेस्क्यू करून
सापाला व्यवस्थित रित्या त्याब्यात घेतली असता या सापाला मोठा जखमी असल्याचे आढळून आले. या भारतीय नाग जातीच्या सापाच्या शेपटीपासून पोटाकडे एक फुटाच्या अंतरावर मोठी जखम असल्यामुळे सर्पमित्र प्रदिप पट्टेबहादुर, विष्णू पायघन यांनी वाशिम येथील व्हेटर्नरी डॉक्टर तथा सर्पमित्र गणेश फूलउंबळकर यांच्याकडे घेऊन गेले असता जखमी असलेल्या सापावर ४ टाचे देऊन सर्पमित्र गोपाल बोरचाटे यांच्याकडे ६ दिवसांसाठी उपचाराकरिता ठेवण्यात आले.१ जानेवारी २०२५ ला दुपारी १२:२८ मिनिटाला या सापाची प्रकृती लक्षात घेता तो पूर्णपणे बरा झाला. या सापाला सर्पमित्र गोपाल बोरचाटे, गणेश फुलंबळकर प्रदीप पट्टेबहादुर विष्णू पायघन यांनी जखमी सापाचा जीव वाचवून नवीन जीवनदान देण्याचा आनंद अंगीकारत मोठ्या आनंदाने या सापाला दूर जंगलामध्ये नेऊन सुरक्षित सोडले.
तसेच सर्पमित्रांनी परिसरातील नागरिकांना आव्हान केले.की सापाला जीवी न मारता आपण सापाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा. कारण साप हा निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या भागामध्ये जर कुठल्या साप आढळला तर आपण वनविभाग अथवा सर्पमित्र याच्याशी संपर्क साधावा असे आव्हान यावेळी सर्पमित्र यांच्याकडून करण्यात आले
सर्प व प्राणी मित्रा प्रदिप पट्टेबहादुर वाशिम मो. 8766558088,विष्णू पायघन मो.7020775839, गणेश फुलंउबळकर मो.9623052965, गोपाल बोरचाटे मालेगाव मो.8381088016,रिसोड सुमित तायडे मो.9049678949





Social Plugin