सांगली जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे वतीने निवृत्त सेवक एकात्मता दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने सांगलीत साजरा करण्यात आला . सुरुवातीला संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळासाहेब पेंडूरकर यांनी पाहुणेंचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी सेवानिवृत्त सेवकांचा सत्कार करण्यात आला. आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ वामन निंबाजी साळवे यांनी सेवा निवृत्त सेवकांच्या समस्या संबंधी विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विलास चौथाई होते. अंजुमन खान, जे.के.महाडीक, सदाशिव सुर्यवंशी दिलीप पाटील ,राजन औंधकर, सुभाष पाटील, नलिनी यतवाळे, मंजुळा साळे, सुलभा कट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.मनोहर भोई यांनी सुत्रसंचलन केले.भिमराव रावहटे यांनी आभार मानले.





Social Plugin