पत्रकार:- मोहन जाधव @ प्रतिनीधी
-बक्तरपुर (कोपरगाव):
कोपरगाव तालुक्यातील बक्तरपुर येथील प्राथमिक शाळेत ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या आणि शाळेतील शिक्षक,विद्यार्थीच्या समवेत साजरा केला गेला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच मुक्ताबाई नागरे उपसरपंच कमलाबाई सानप ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलीस पाटील भारत सानप तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाना सानप यांनी तंटामुक्ती अध्यक्षाची सूचना मांडली असता एकनाथ सानप यांनी या सूचनेस अनुमोदन दिले. सर्व ग्रामस्थांच्या एकमताने तंटामुक्ती अध्यक्षांची निवड पदी अशोक सानप यांची एकमताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या वेळेस त्यांचा सत्कार करण्यात आला
तसेच यावेळी ग्रामस्थांनी अशोक सानप यांच्या मागील कामाची कारकीर्द तसेच कामाचा अनुभव तसेच काम करण्याची पद्धत यांची प्रशंसा केली त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन सर्व गावकऱ्यांनी एकमतांनी त्यांचे नाव सुचवले. सदर कार्यक्रमाप्रसंगी गावातील ज्येष्ठ मंडळी सोमनाथ सानप, विशाल सानप, अरुण डोंगरे, नानासाहेब सानप, साहेबराव सानप, गणेश सानप, गोवर्धन सानप, अशोकराव नागरे, शरदराव गरुड, दिलीप गरुड, माधव गरुड, रमेश गरुड, आनंदा सानप वर्षा नागरे, शिवाजी सानप, काळू नागरे, रावबा सानप यांनी पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गणेश नागरे यांनी केले.





Social Plugin