मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले
श्री खंडोबा महाराज संस्थान मेडशी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री खंडोबा महाराज यात्रा कमिटी व समस्त गावकरी मंडळ मेडशी यांच्या माध्यमातून भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवामध्ये दरवर्षी प्रमाणे श्री हरिनाम सप्ताह, महापुराण भागवत कथा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. ह भ प प्रभुजी महाराज गोभणीकर यांच्या मार्गदर्शन व उपस्थिती भागवत प्रारंभ, तसेच बुधवार दि: 22 जाने 2025 रोजी रात्री 8ते 11भजनाची वेळ असेल.
पौष वद्य 15 मौनी अमावस्य बुधवार 29 जाने 2025 रोजी सकाळी 9 ते 11 काल्याचे किर्तन तसेच बुधवार दि: 29 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता बारी पद्धतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.तरी परिसरातील सर्व गाव खेड्यातील भाविक भक्तांनी व गावकऱ्यांनी श्री खंडोबा महाराज भव्य यात्रा महोत्सवाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आव्हान श्री खंडोबा महाराज यात्रा कमिटी व समस्त गावकरी मंडळ मेडशी यांच्याकडून सोशल माध्यमाद्वारे करण्यात येत आहे





Social Plugin