Ticker

6/recent/ticker-posts

होमिओपॅथिक डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध- खा.डॉ. कल्याण काळे



 भगवान होमिओपॅथी कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉ.पी. वाय .कुलकर्णी आणि डॉ. प्रकाश झांबड जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित


  यशवंत पवार @ छत्रपती संभाजीनगर  प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर येथील श्री भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजला सुवर्ण महोत्सवी वर्षापूर्वी निमित्त 1979 ते 19 85 या वर्षात शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची Alluminy meet  2025 छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद जिमखाना क्लब येथे उत्साहात पार पडली.

     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष ज्येष्ठ युरो सर्जन डॉ. पी.एम.दरक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि सध्याचे जालना जिल्ह्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, डॉ.भागवत कराड (माजी केंद्रीय मंत्री) तसेच डॉ. विलास हरपाळे, डॉ. आर. जी .चरखा (माजी प्राचार्य ) डॉ. पी.वाय.कुलकर्णी (अध्यक्ष सायली ट्रस्ट ), डॉ. रवी भोसले (माजी प्राचार्य ) ,डॉक्टर कांचन देसरडा (अध्यक्ष गुरु मिस्त्री कॉलेज )   डॉ. लाटकर इत्यादी हजर होते .कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या मूर्ती पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश झांबड (अध्यक्ष हिम्पम) यांनी केले .

   यावेळी प्रमुख पाहुणे खासदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, महाराष्ट्रातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी रुग्णांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सेवा दिली आहे, कोरोना काळातही जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्णांचे जीव वाचविले ,अशा सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याचा परवानगी सोबतच त्यांची रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून नोंद होणे गरजेचे आहे या सर्व प्रश्नांसाठी मी कटीबद्ध आहे असे सांगितले.

      यावेळी श्रीमती कांचन देसरडा, डॉक्टर पीएम दरक यांनी देखील उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी गेल्या पन्नास वर्षात होमिओपॅथीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल  डॉ.पी. वाय. कुलकर्णी  (अध्यक्ष सायली ट्रस्ट) ,आणि डॉ.प्रकाश झांबड ( अध्यक्ष हिंम्पम ) यांचा खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

     कार्यक्रमा दरम्यान डॉक्टरांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गीत गायन आणि लावणी नृत्य यांनी धमाल उडून दिली .कार्यक्रमास डॉ. चौधरी (मुकुंदवाडी) ,डॉ,नावंदर ,डॉ सतिष वैष्णव ,डॉ.मनोज नागोरी डॉ,प्रकाश चव्हाण (कन्नड ), डॉ. बागल ,डॉ.प्रशांत पवार (देवगाव ),डॉ. प्रमोद गंगवाल, डॉ, तिप्पनवार (पुणे), डॉ. तुवर( कडेठाण), डॉ. बकाल, डॉ, बोडखे( शेवगाव ) डॉ.भागवत (अंदरसुल) , डॉ. नारायण निकम (बाजार सावंगी ) ,डॉ भावसार (येवला) डॉ. सलीम खान( पीर बावडा ) ,डॉ. राजेंद्र गौड, डॉ. आशा शेठीया, डॉ. खटोड, डॉ,कल्पना लुंकड, डॉ, सरिता टेकाळे, डॉ.यशवंत पवार(कन्नड ) सह शेकडो डॉक्टर उपस्थित होते.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. हरीश नागदकर, डॉ. धनंजय काळुसे, डॉ. महेंद्र जैन, डॉ. निर्मला मुथा,  डॉ. अनिल गंगवाल, डॉ. किशोर जैन ,डॉ.राजेंद्र पुरवार ,डॉ. राजेश तातेड यांनी मेहनत घेतली.संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार संचलन आरती झांबड यांनी केले.तर शेवटी डॉ. अजय गुजराती (सचिव हिंम्पम) यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले.