यादवराव बुराडे : ग्रामीण प्रतिनिधी
तिळगुळ घ्या गोड-गोड बोला असे प्रत्येक मकर संक्रॅातीला आपण बोलत असतो व तिळ संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो.परंतु मागील ३ महिन्या पासुन दिंव्याग व निराधार यांच मासिक मानधन न मिळाल्याने त्यांची तिळ संक्रांत एकदमच कडू झाल्याचे चित्र संपुर्ण तुमसर तालुक्यात पाहायला मिळत आहे. दिव्यांग व निराधार यांच थकीत मासिक मानधन तात्काळ त्यांना मिळाव या करीता प्रहार दिंव्याग संघटनेचे तुमसर तालुका प्रमुख सन्माननीय शेषरावजी गणविर व त्यांच्या चमूनी मा.तहसीलदार साहेब तुमसर यांना निवेदन सादर केले. दिव्यांग व निराधारांना त्यांच थकित मासिक मानधन लवकरात लवकर मिळाव या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी टवरचंद हाडगे प्रहार सेवक,यादवराव बुराडे (परमात्मा एक मानव विकास) रमेश ठवकर यांनी उपस्थीती दर्शविली.





Social Plugin