मेहकर तालुक्यातील दर्या खोऱ्यात वसलेले गाव तसेच मेहकर तालुक्यातील शेवटचे टोक असलेले गाव म्हणजे मोहना बु दि 19 जानेवारी 2025 रोजी मोहना बु येथे श्री संत भानुदास महाराज यात्रा महोत्सव व भव्य दिव्य असे महाप्रसाद थाटात संपन्न झाला या महाप्रसादाची रूपरेषा सकाळी पाच वाजता पंचक्रोशीतील भाविक भक्तगण सर्व पालखी मेळावा व ध्वज पूजन कार्यक्रमासाठी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहले सकाळी कलश पूजन व ध्वज पूजन झाल्यानंतर संपूर्ण गावातून ही वाजत गाजत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या कलास मिरवणुकीमध्ये गावातील मुलं मुली हजर असतात बंजारा भजन कीर्तनासह पालखीमध्ये कलश मिरवणूक व संस्थानांचा अश्व आणि या संस्थांचे विश्वस्त श्री जानकीराम महाराज टेंभुखेड येथील महत श्री हिमंत महाराज व गावातील नायक कारभारी पंचगण व इतर लोक या उत्सवामध्ये आणि पंचक्रोशीतील व इतर जिल्ह्यातील लोकांचाही सहभाग होता या मिरवणुकीच्या स्वागतासाठी अंगणात रांगोळी काढण्यात आली होती
तसेच मिरवणूक दरम्यान फराळाचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले होते जानकीराम चव्हाण फकीराचंद चव्हाण कैलास चव्हाण बबन चव्हाण गणेश चव्हाण चक्की वाले मेहकर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी देवानंद पवार नामदेव राठोड रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते चहापाणी फराळ वाटप करण्यात आले महाप्रसादामध्ये शिस्तबद्ध अशा नियोजनामध्ये भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाला सदिच्छा भेट देऊन भविष्यात आणखी या ठिकाणी काही योगदान देता आले तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांनी या संस्थांच्या योगदानात खूप भरीव मोठी निधी उपलब्ध करून दिलेली आहे
त्यामुळे संस्थांच्या वतीने त्यांचेही आभार मानले तसेच युवा नेते आशिष रहाटे यांनीही प्रामुख्याने या ठिकाणी येऊन मनोभावे दर्शन घेतले व महाराजांचा आशीर्वाद ही घेतला भविष्यात आपणही दरवर्षी या ठिकाणी यात्रा महोत्सव साठी आवर्जून येत राहू असा शब्दही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला तसेच जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आदिनाथ मोरे यांनी पोलीस बंदोबस्त लावल्यामुळे ट्रॅफिक व्यवस्था चोख लावल्यामुळे संस्थांनी त्यांचे आभार मानले आले त्यानंतर दुपारी तीन वाजेपासून रात्री भक्तगणच्या आगमनापर्यंत त्यांना प्रसाद वितरित करण्यात आले
.jpg)




Social Plugin